प्रार्थना
ज ज्यावेळी आपण प्रार्थना स्थळावर जातो त्या वेळी आपले विचार वर्तन हे चांगले असायलाच हवे. आणि त्यात सातत्य असायला हवे. आपल्या वर्तनात बदल व्हायला हवा तरच आपण त्या प्रार्थना स्थळावर गेलेल्याचा आपल्याला आणि आपल्या समाजाला फायदा होऊ शकतो. परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे. त्याला सगळेच प्रिय आहेत. आणि आपण हे जर मांडत असू तर आपल्यासाठी सुद्धा सगळी माणसं आणि सगळा समाज हा सारखाच असायला हवा. आपण कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या पंथाचे आहोत आणि कोणत्या जातीचे आहोत हे गरजेचे नाही. जर आपण संतपरंपरा बघितली तर आपल्याला वेगवेगळ्या धर्माचे आणि पंथाचे संत मिळतील आणि त्या सगळ्यांची शिकवण ही सर्वधर्मसमभाव असल्याची आपल्याला जाणीव होईल. कोणताही धर्म किंवा पंथ दुसऱ्या धर्माचा किंवा पंथाचा तिरस्कार करा असं कुठेही लिहिलेले नाही. परंतु आपले वाचन न झाल्यामुळे किंवा आपण या गोष्टीकडे न बघितल्यामुळे आपल्याला धर्माचा नेमका अर्थ समजत नाही. ज्यावेळी आपण दुसऱ्या धर्माचा आदर करतो त्यावेळी त्या धर्माने सुद्धा आपल्या धर्माचा आदर करायला हवा. कोणत्याही धर्माचे असा आणि कोणत्याही देवाची प्रार्थना करा किंवा करू नका. परंतु जर तुमच्यात दया, क्षमा, शांती, परोपकार आणि सहिष्णुता नसेल तर तर सर्व निरर्थक आहे.
Comments
Post a Comment