"शिक्षण" म्हणे तिसरा डोळा
भुकेलेल्या साठी देण्या अन्न
हात पुढे सरसावत नसतील,
गरजूंसाठी विचार कधी मनात
जर कधी येतच नसतील,
मग भावनांचा नुसताच उमाळा
"शिक्षण" म्हणे तिसरा डोळा.
माझे आता झाले भले समाजाचे मला काय घेणे?
मी भला माझे कुटुंब भले ,
मी काय म्हणून लागतो देणे?
वाटत नसेल कुणासाठी कळवळा ?
"शिक्षण" म्हणे तिसरा डोळा.
समाजशास्त्र कळले नाही
गणिताचा फक्त व्यवहार केला,
भाषेचे सौंदर्य कळलेच नाही
विज्ञानाचा फक्त आभास केला,
विसरून माणुसकी भेट देवळा
"शिक्षण" म्हणे तिसरा डोळा.
डोळ्यांना गरिबी दिसत नसेल
दुःखितांचे अश्रू नसतील दिसत,
(साने)गुरुजी सारखी ह्रदय नसेल
तर सर्टिफिकेट हा नुसताच बोळा,
"शिक्षण" म्हणजे तिसरा डोळा.
- श्री संजय चव्हाण
छान
ReplyDelete