संवाद आणि गाठीभेटी.
टेलिफोन आणि मोबाईल फोन येण्याच्या आधी लोक एकमेकांना भेटत असत, चौकशी करत आणि संवाद साधत असत. त्यांची ही पद्धत फार वेगळी असेल त्या परिसरामध्ये असलेला ठराविक बाजाराचा दिवस, विशिष्ट वेळी भरणारी जत्रा आणि यात्रा या ठिकाणी हे लोक एकत्र येत आणि भेट असत किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक एकत्र यायचे सगळे भेटू शकले नाही तरी किमान एक प्रतिनिधी तिथे हजर असायचा आणि मग दोन महिने, चार महिने किंवा सहा महिने जे काही घडलं ते एकमेकांना सांगत असत. लग्न सुद्धा गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी होत असत माणसं मुक्कामाला थांबत असत. परंतु अलीकडे टेलिफोन आले, मोबाईल फोन आले आणि संपर्क वाढण्याऐवजी तो कमी झालेला आपल्याला दिसेल मेसेज पाठवणं आणि प्रत्यक्ष बोलणं यांच्यामध्ये फार फरक आहे. मेसेज पाठवताना सुद्धा इकडचे मेसेज तिकडे पाठवला जातो तिकडचा मेसेज तिकडे पाठवला जातो. पत्र लिहिताना जी आत्मियता असायची ती या मेसेजमध्ये जवळजवळ नसते. कधीकधी न वाचल्यामुळे गुड मॉर्निंग ऐवजी गुड नाईटचा मेसेज पाठवला जातो. खरं म्हणजे या आधुनिक युगात एवढे संपर्क साहित्य आणि साधन असताना संवाद वाढण्याऐवजी ते कमी झालेले आपल्याला दिसते आणि कारण फक्त एकच, वेळ मिळत नाही. खरं म्हणजे जर वेळ काढला तर तो भरपूर असतो पण वेळ काढायचाच नसेल तर मला वेळच नसतो. मोबाईल असल्यामुळे तुम्ही कुठेही चालताना, बोलताना एखाद्या माणसाशी संपर्क साधू शकतात. त्याला फोन करू शकतात, त्याच्याशी बोलू शकतात परंतु तसं घडताना दिसत नाही. उलट मी एखाद्या ठिकाणी असेल आणि तो व्यक्ती त्या परिसरात असेल तरीसुद्धा मोबाईल असल्यामुळे मी फार दूर अंतरावर आहे, मी येऊ शकत नाही किंवा गावाला गेलो आहे. अशी अनेक कारणे सांगून टाळले जाते. टेलिफोनचे तसं नव्हतं आपल्याला तर नंबर बघून किमान कळत तरी होतं की तो कुठे असेल. मोबाईलचं तसं नाही त्याच्यामुळे खोटं बोलण्याचे सुद्धा प्रमाण त्याच्यामुळे वाढलेले आजकाल दिसतं. मुंबईत तर एकाच एरिया मध्ये राहणारी माणसं दोन- दोन ,तीन-तीन महिने एकमेकांना भेटत नाही अशा या आधुनिक काळात माणसं माणसांपासून दुरावलेली आपल्याला दिसत आहेत.
Comments
Post a Comment