Posts

Showing posts from January, 2022

प्रार्थना

ज ज्यावेळी आपण प्रार्थना स्थळावर जातो त्या वेळी आपले विचार वर्तन हे चांगले असायलाच हवे. आणि त्यात सातत्य असायला हवे. आपल्या वर्तनात बदल व्हायला हवा तरच आपण त्या प्रार्थना स्थळावर गेलेल्याचा आपल्याला आणि आपल्या समाजाला फायदा होऊ शकतो. परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे. त्याला सगळेच प्रिय आहेत. आणि आपण हे जर मांडत असू तर आपल्यासाठी सुद्धा सगळी माणसं आणि सगळा समाज हा सारखाच असायला हवा. आपण कोणत्या धर्माचे आहोत, कोणत्या पंथाचे आहोत आणि कोणत्या जातीचे आहोत हे गरजेचे नाही. जर आपण संतपरंपरा बघितली तर आपल्याला वेगवेगळ्या धर्माचे आणि पंथाचे संत मिळतील आणि त्या सगळ्यांची शिकवण ही सर्वधर्मसमभाव असल्याची आपल्याला जाणीव होईल. कोणताही धर्म किंवा पंथ दुसऱ्या धर्माचा किंवा पंथाचा तिरस्कार करा असं कुठेही लिहिलेले नाही. परंतु आपले वाचन न झाल्यामुळे किंवा आपण या गोष्टीकडे न बघितल्यामुळे आपल्याला धर्माचा नेमका अर्थ समजत नाही. ज्यावेळी आपण दुसऱ्या धर्माचा आदर करतो त्यावेळी त्या धर्माने सुद्धा आपल्या धर्माचा आदर करायला हवा. कोणत्याही धर्माचे असा आणि कोणत्याही देवाची प्रार्थना करा किंवा करू नका.  परंतु जर...

संवाद आणि गाठीभेटी.

टेलिफोन आणि मोबाईल फोन येण्याच्या आधी लोक एकमेकांना भेटत असत, चौकशी करत आणि संवाद साधत असत. त्यांची ही पद्धत फार वेगळी असेल त्या परिसरामध्ये असलेला ठराविक बाजाराचा दिवस, विशिष्ट वेळी भरणारी जत्रा आणि यात्रा या ठिकाणी हे लोक एकत्र येत आणि भेट असत किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने लोक एकत्र यायचे सगळे भेटू शकले नाही तरी किमान एक प्रतिनिधी तिथे हजर असायचा आणि मग दोन महिने, चार महिने किंवा सहा महिने जे काही घडलं ते एकमेकांना सांगत असत. लग्न सुद्धा गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळी होत असत माणसं मुक्कामाला थांबत असत. परंतु अलीकडे टेलिफोन आले, मोबाईल फोन आले आणि संपर्क वाढण्याऐवजी तो कमी झालेला आपल्याला दिसेल मेसेज पाठवणं आणि प्रत्यक्ष बोलणं यांच्यामध्ये फार फरक आहे. मेसेज पाठवताना सुद्धा इकडचे मेसेज तिकडे पाठवला जातो तिकडचा मेसेज तिकडे पाठवला जातो. पत्र लिहिताना जी आत्मियता असायची ती या मेसेजमध्ये जवळजवळ नसते. कधीकधी न वाचल्यामुळे गुड मॉर्निंग ऐवजी गुड नाईटचा मेसेज पाठवला जातो. खरं म्हणजे या आधुनिक युगात एवढे संपर्क साहित्य आणि साधन असताना संवाद वाढण्याऐवजी ते कमी झालेले आपल्याला दिसते आणि ...