Posts

Showing posts from December, 2024

सर्वांचा कैवारी /अस्पृश्यांचा मायबाप

  ज्ञान कण वेचत गेले  अस्पृश्य पंडितही झाले  विद्वत्ता मिळवून बाबा  मागासांना बळ दिले.  हाल अपेष्टा सोसल्या जरी  केला विचार सर्वांचा तरी  संविधान लिहिताना भीमा  सर्वांचे झालात तुम्ही कैवारी  'अस्पृश्य' म्हणजे असते काय?  वाचून फक्त समजत न्हाय  तूच आमचा प्रेषित झाला  आणि मिळाला आम्हाला न्याय. ना मनात सुड भावना  ना द्वेष होता मना  न सांगता कुणीही साहेब  न्याय दिला तुम्ही सर्वांना  तू त्यांना कळलाच नाही  द्वेषामुळे ते कळलेही नाही  देवा एवढाच तू आमच्यासाठी देणे घेणे त्यांना नाही. बा भीमा तू देवच होता  अस्पृश्यांचा तू मायबाप होता. देव पावला आठवत नाही तूच आमचा त्राता होता  सर्वांचा आपण विचार केला पण भीमाला अस्पृश्यच ठेवला  इतरांना भीम कळेलच कसा? त्याचा तर फक्त द्वेषच केला पण मग फाटते जेव्हा  संविधानावर ठेवतात विश्वास तेव्हा  पण मनात मात्र भाव तोच  मानत होते कुठे केव्हा?  खंत भिमा एवढीच आहे  भारताचे संविधान 'गीताच' आहे  तू फक्त दलितांचा झाला  एवढा त्यांचा अ...